माजी क्रिकेटर मनोज तिवारी यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश; अभिनेत्री सयानी घोषही ‘तृणमूल’च्या तंबूत

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय मैदानात चेहऱ्यावर बोली लावली जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू मनोज तिवारी यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला. ममता बॅनर्जी यांनी हुगलीच्या डनलप ग्राऊंड येथे जाहीरसभा घेतली. या सभेत मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत केले. क्रिकेटच्या विश्वातून राजकारणात आलेले मनोज तिवारी यांनी भाजपवर टीका केली. मनोज तिवारी यांनी सांगितले, की मी एक क्रिकेटर आहे. ज्याने भारताचा झेंडा घेतला. मला जे प्रेम मिळाले ते हिंदू किंवा मुस्लिम यांच्याकडून नाही तर भारतीयांकडून मिळाले आहे. भाजप जातीयवादाच्या नावावर विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ममता बॅनर्जी सेक्युलर मार्गाने पुढे जात आहे.

दरम्यान, हुगलीच्या मंचवर आज मनोज तिवारी यांच्याशिवाय काही अभिनेत्री, अभिनेता आणि प्रोड्युसरही पक्षाचा झेंडा हाती घेताना दिसले. अभिनेत्री सयानी घोष, जून मालिया, प्रोड्युसर राज चक्रवर्ती आणि अभिनेता कंचन मलिक यांनीही ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.