माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा BJP मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट आणि राजकारणाचा अधिक संबध येत असल्याचे दिसून येत आहे. आता पर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूनी भारतात प्रवेश केला आहे. त्यात आता भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन (Former cricketer and commentator Laxman Shivaramkrishnan) आता राजकीय पीचवर आपले नशीब आजमावणार आहेत. चेन्नई येथे शिवरामकृष्णन यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणाची नवी इनिंग सुरु केली आहे.

शिवरामकृष्णन यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. टी. राव उपस्थित होते. शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राव यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर राव यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांत यांच्या पक्ष न स्थापन करण्याच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, रजनीकांत हे दिग्गज नेते आहेत. आम्ही सर्वजण त्यांचा आदर करतो. रजनीकांत तामिळनाडू आणि देशहिताच्या बाजून नेहमी उभे राहतात. जनतेच्या हितावर त्यांचा नेहमी भर असतो, असे ते म्हणाले.

शिवरामकृष्णन यांची कारकीर्द
लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी भारताकडून 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 26 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान यापूर्वी राजकारणात गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, कीर्ती आझाद, विनोद कांबळी आदी क्रिकेटपटूनी राजकारणात प्रवेश केला आहे.