माजी मंत्री विजय शिवतारे हॉस्पिटलमध्ये, मुलीनं लिहिली भावांबद्दल धक्कादायक Facebook पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital in Mumbai) दाखल करण्यात आले आहे. शिवतारे (Vijay Shivtare) यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे (ममता शिवदीप लांडे-शिवतारे) यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital in Mumbai) पहाटे 2 वाजता दाखल केले आहे. मनात यांनी रुग्णालयातूनच फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपले भाऊ विनय आणि विनस शिवतारे यांच्यावर विविध गंभीर आरोप केलेत. former minister vijay shivtare admited in mumbai hospital daughter mamata lande shivtare wrote a shocking facebook post about her brothers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी काय केलेत आरोप ?
‘मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न..
‘मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.

Gold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित घसरण; जाणून घ्या

आजारी वडिलांचा भावांकडून मानसिक छळ..
मागील वर्षी जानेवारी 2020 मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे.
डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता 20 टक्के आहे असे सांगितले.
माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती.
ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता.
मागिल दीड वर्ष्यापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात.
या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही.
ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही.
त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. असा आरोप ममता यांनी केला आहे.

‘आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली.
तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे.
या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती.

Pune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली

मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी 2020 मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे.” असंही ममता यांनी लिहिलं आहे.

‘आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलं. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. ICU मध्ये रात्री 2 वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. ‘माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे.!!! अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

ममता शिवतारे लांडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न –
1 – 1994साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज 27 वर्षानंतर त्या का आठवाव्यात ?
2 – बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने 2018 पर्यंत का सांभाळला ?
3 – बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली ?
4 – विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल ?
5 – वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्युशय्येवर असलेल्या वडलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का ?

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : former minister vijay shivtare admited in mumbai hospital daughter mamata lande shivtare wrote a shocking facebook post about her brothers

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ