Former MLA Mohan Joshi | ‘खासदार बापट यांची आदळआपट कशासाठी? मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी’

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन –  Former MLA Mohan Joshi | हिंजवडी मेट्रो (Hinjewadi Metro) लवकर सुरु करावी, या मागणीसाठी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे. बापट यांची ही आदळआपट कशासाठी ? अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) केली आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाची (shivaji nagar to hinjewadi metro route) प्राथमिक तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. ९८ टक्के भूसंपादनही झालेले आहे. त्यामुळे मेट्रोचे (Pune Metro) काम कधीही सुरु होऊ शकते. हे माहीत असूनही काम सुरु करावे अशा मागणीसाठी खासदार बापट (MP Girish Bapat) यांनी आंदोलन सुरु केले. आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खूष करण्यासाठी हा दिखाऊपणा आहे याची जाणीव भाजप नेत्यांसह पुणेकरांनाही आहे. पुण्यातील मेट्रो मार्गासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) कायमच पाठबळ दिले आहे. आंदोलन करुन राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल दिशाभूल करण्याचा बापटांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुण्यात स्मार्ट सिटी (Pune Smart City) योजना फसलेली आहे. मुळा-मुठा नदी संवर्धन योजना (mula mutha river rejuvenation project), जायका प्रकल्प (jica project pmc), समान पाणीपुरवठा योजना असे मोठे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत लांबणीवर पडलेले आहेत. खासदार बापट (MP Bapat) यांनी आता त्यासाठी आंदोलन करायला हवे, असा सल्ला मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिला.

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | ‘Why the clash of MP Girish Bapat? Metro agitation is pure stunt ‘ – former mla mohan joshi-pune metro

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

 

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या