Former MLA Sharad Patil Passed Away | जायंट किलर माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातून (Pune Graduate Constituency) प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांचा पराभव करुन जायंट किलर ठरलेले जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील (Former MLA Sharad Patil Passed Away) यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी पहाटे त्यांना ह्दयविकाराचा धक्का (Heart Attack) बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली शहरातील कुपवाड येथे त्यांचे वास्तव्य होते. कुपवाड स्मशान भूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Former MLA Sharad Patil Passed Away)

देशभक्त आर पी पाटील यांचे सुपुत्र प्रा. शरद पाटील यांनी वडिलांचा वारसा आपल्या कामातून जपला. मिरजेतील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले.

प्रा. शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघातून १९९० आणि १९९५ मध्ये निवडून आले होते. संभाजी पवार,
व्यंकाप्पा पत्की आणि शरद पाटील ही जनता दलाची त्रिमूर्ती विधीमंडळात प्रसिद्ध होती. (Former MLA Sharad Patil Passed Away)

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात असे. २००२ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात
आपला झेंडा फडकविण्याचा निर्धार प्रा. शरद पाटील व त्यांच्या समर्थकांनी केला होता. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय
क्षेत्रात काम करणार्‍यांना हाताशी धरुन त्यांनी अगदी मतदार नोंदणी करण्यापासून थेट जोरदार प्रचार मोहिम राबवून
भाजपचे दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांच्या पराभूत करीत ते जायंट किलर ठरले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पाणीपट्टी थकविणारी शासकिय कार्यालये व कॅन्टोंन्मेंट बोर्डचा पाणी पुरवठा बंद करणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Manoj Jarange Patil | ”राजकारणात माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही”, मनोज जरांगेंचे थेट उत्तर