Manoj Jarange Patil | ”राजकारणात माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही”, मनोज जरांगेंचे थेट उत्तर

मुंबई : Manoj Jarange Patil | लोक मांड्या थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद आहे. राजकारण हा आमचा मार्ग नाही. आम्ही राजकारणाची चीड असणारे लोक आहोत. जनआंदोलनामुळे गोर गरिबांना न्याय मिळतो. राजकारणाकडे माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही, असे थेट उत्तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहे.

मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे, अशी इच्छा सध्या अनेकजण वर्तवत आहेत. आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (MIM Leader Imtiaz Jaleel) यांनीही अशीच मागणी केली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे यांनी वरील उत्तर दिले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे. ही पोरं मोठी झाली पाहिजेत, असं आम्हाला वाटतं. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जन चळवळीत ताकद आहे हे आता सिद्ध झालंय.

जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, लोकांचा समज होता की आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता.
गरिबांचं कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणं. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना
आरक्षण मिळालं आहे.

इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याबाबत मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आणि
मराठा समाजासाठी जन चळवळ उभी करावी. मुस्लीम समाज आणि मराठा समाज आपण एकत्र आणू
आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | अटक टाळण्यासाठी सराईत गुन्हेगाराने पोलीस पथकावर सोडले पाळीव श्वान, पुण्यातील प्रकार

Shalini Patil | शालिनीताई पाटलांचे धक्कादायक वक्तव्य, अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार, एकनाथ शिंदेबद्दल म्हणाल्या…

अकाउंट मॅनेजर तरुणीची साडे दहा लाखांची फसवणूक, पिंपरी चिंचवडमधील प्रकार