Former MP Sanjay Kakade | ‘मोदी@9’ पुस्तिकेचे बावनकुळेंच्या हस्ते प्रकाशन

संजय काकडे यांच्या वतीने पुणे लोकसभा मतदार संघात 60 हजार प्रती वितरित होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former MP Sanjay Kakade | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे (Former MP Sanjay Kakade) यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रती पुणे लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते आज झाला.

 

या पुस्तिकेचे पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha Constituency) सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार पुस्तिकांचे वाटप स्वतः संजय काकडे करणार आहेत. त्या त्या विधानसभा मतदार संघातील 25 ते 30 कार्यकर्ते सोबत घेऊन ही पुस्तिका नागरिकांना देण्यात येणार आहे, असे संजय काकडे (Former MP Sanjay Kakade) यांनी सांगितले.

 

याप्रसंगी भाजपाचे नेते व माजी मंत्री दिलीप कांबळे (Former Minister Dilip Kamble), पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी नगरसेवक राहुल भंडारे (Rahul Bhandare), बापू कर्णे गुरुजी, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, राजेंद्र शिळीमकर, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, मुकारी आलगुडे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश गलांडे, संतोष आरडे, पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्वाती शिंदे, लहू बालवडकर, तुषार पाटील, ओंकार कदम, समाधान शिंदे, आनंद छाजेड, योगेश हुलावळे, अनुप मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

मोदींच्या कामांना प्रत्येकापर्यंत पोहचवणार

पुणे लोकसभा मतदार संघातील भाजी विक्रेत्या पासून ते मॉलपर्यंत, छोटा व्यावसायिक ते उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, डॉक्टरसह सर्व क्षेत्रातील मान्यवर, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही पुस्तिका प्रत्यक्ष भेटून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आणि देशातील प्रत्येकासाठी काम केले आहे. मोदींच्या दूरदृष्टीकोनातून राबविण्यात आलेल्या योजनांमुळे आपल्या देशाची प्रगती वेगाने होत आहेत. मोदींची ही कामे, त्यांच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम मी करणार आहे.

 

संजय काकडे (माजी खासदार)

गोरगरीब जनतेसाठी सेवा व वंचितांचा विकास, शेतकरी कल्याणासाठी योजना, महिला व बालकल्याण विकास, मध्यम वर्गासाठी विकासाच्या योजना, आरोग्य सेवा, आर्थिक सशक्तीकरण, व्यापार व उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी ठोस योजना, भारत एक महाशक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी मोदी सरकारकडून आखण्यात आलेल्या योजनांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

 

गोव्याचे मुख्यमंत्री सावंतांना पुस्तिकेची भेट

मोदी@9 पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर ही पुस्तिका माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना भेट देण्यात आली.
पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात या पुस्तिकेच्या
प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार प्रती वितरित करण्यात येणार आहेत.

 

Web Title :  Former MP Sanjay Kakade | Publication of ‘Modi@9’ booklet by Chandrasekhar Bawankule
60 thousand copies will be distributed in Pune Lok Sabha constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा