अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, अद्याप डिस्चार्ज नाही

वनवी दिल्ली : वृत्तसंस्था

आज सकाळी भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणी करिता दिल्लीतल्या एम्स रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. एम्स च्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना रुग्नालयातून डिस्चार्ज दिला नाही. त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या अद्यापही करण्यात येत आहेत. त्यांना कुणालाही भेटण्याची परवानगी अद्याप डॉक्टरांनी दिली नाही. भाजपने वाजपेयींना दवाखान्यात दाखल केल्यानंतर तातडीने पत्रक काढून  माहिती दिली आहे.

देशाच्या राजकारणामध्ये अटल बिहारी वाजपेयींचे खूप मोठे योगदान आहे. अगदी जनसंघापासून पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

आपल्या कारकिर्दीत राजकीय आणि सरकारमधील अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. 93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असतात.