तृणमूल काँग्रेसला खिंडार; 5 माजी नेते करणार भाजपमध्ये प्रवेश, मुकूल रॉय यांच्यासह पोहचले दिल्लीत

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. तत्पूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. कारण ऐननिवडणुकीच्या तोंडावर राजीव बॅनर्जी, बैशाली डालमिया, प्रबीर घोषाल, रथिन चक्रबर्ती आणि पार्थ सारथी चॅटर्जी हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या पश्चिम बंगालचे माजी मंत्री राजीव बॅनर्जी हे आज (शनिवार) पक्षातील काही नाराज आमदार आणि नेत्यांसोबत दिल्लीत पोहोचले. ते दिल्लीत गेल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

बॅनर्जी यांच्यासोबत आमदार प्रबीर घोषाल आणि बैशाली डालमिया आणि हावडाचे माजी महापौर रतीन चक्रवर्ती हे एका विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले असून, ते भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहे. घोषाल आणि डालमिया यांना नुकतेच तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.

अमित शहांकडून बोलावणे
दरम्यान, राजीब बॅनर्जी यांनी सांगितले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी दिल्लीत येण्याचे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही दिल्लीला जात आहोत.