…आणि या मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या लोकप्रिय अध्यक्ष पैकी एक माजी अध्यक्ष बराक ओबामा हे मुलांमध्ये ही तितकेच लोकप्रिय आहेत. अध्यक्षपद सोडल्यानंतर ही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वेळा मुलांची भेट घेऊन संवाद साधला आहे. आणि यावेळेस ही ते लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा करत आहे विशेष म्हणजे त्यांनी  यावेळी  हॉस्पिटलमधील आजारी मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला आहे.

वॉशिंग्टन मधील एका हॉस्पिटलमध्ये मुलांना भेट देऊन त्यांना गिफ्ट दिले आहे. ओबामा साध्या कपड्यांमध्ये खांद्यावर बॅग घेऊन रुग्णालयात पोहोचले. ओबामांना पाहून लहान मुलंदेखील खूश झाली. ओबामांनी मुलांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर मुलांनी माजी अध्यक्षांसोबत मजामस्ती केली आणि फोटोदेखील काढले म्हणजेच या नाताळात ओबामा  या मुलांसाठी सांताक्लॉज झाले आहे. लहान मुलांसोबत वेळ घालवू दिल्याबद्दल ओबामांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत ख्रिसमसच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.  या भेटीचा व्हिडीओ ओबामा यांनी शेअर केला आहे.

बराक ओबामा हे आठ वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष होते. सध्या ते वॉशिंग्टनमध्ये वास्तव्यास आहे. आणि त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पत्नी मिशेलसोबत शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ख्रिसमस साजरा केला होता.