आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था  –  पाकिस्तान हे शत्रु राष्ट्र असल्याने त्याच्याविरोधात भारतातील जनमत कायमच तीव्र राहिले आहे. त्यामुळेच पाकिस्तानबरोबर क्रिकेट (cricket) मालिका खेळविली जात नाही.
अगदी आयपीएलमध्ये फक्त पाकिस्तानच्या खेळाडुंना याच कारणामुळे प्रवेश बंदी आहे.
असे असताना पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२१ (Pakistan Super League 2021) मधील सामन्यांवर आपल्याकडे चक्क बेटींग (Betting) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांनी बेटींग केल्याच्या आरोपाखाली चार जणांना विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे अटक  केली आहे.
पाकिस्तानमधील सुपर लीगवर भारतात सट्टेबाजी सुरु असल्याचे हा उघडकीस आलेला बहुदा पहिलाच प्रकार असावा.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

कुंचगी रवी कुमार (वय २९), थिमरेड्डी धनुंजय (वय ३४), फरगेट शिवाजी (२९), वीरपनेनी रामबाबू (वय ४३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून २ एलसीडी टीव्ही, २ लॅपटॉप, एक टॅब, ३ स्मार्ट फोन, ५ अकाऊंट बुक, एक कम्युनिकेशन बॉक्स, एक डोंगल, एक राऊटर आणि दीड हजार रुपये असा माल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.
विशाखापट्टणमच्या पॅनोरामा हिल्समध्ये क्रिकेटवर सट्टेबाजी (Betting) सुरु असल्याची माहिती मिळताच.
सिटी टास्क फोर्स आणि पीएम पालेम पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि चार जणांना अटक केली.
सी एच श्रीनिवासु ऊर्फ केबल हा ही सट्टेबाजी (Betting) चालवित असल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून तो फरार झाला आहे.

पाकिस्तान सुपर लीग टी २० ची सुरुवात ९ जून रोजी झाली आहे.
तेव्हापासून हे आरोपी सट्टेबाजी करीत होते.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर संघामध्ये सामना सुरु होता.
त्यावर हे आरोपी सट्टा घेत होते.

Web Title : Four people were arrested for their alleged involvement in illegal betting on cricket matches being played at Pakistan Super League 2021 in Visakhapatnam

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Corona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा

modi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा करते मदत