धावत्या स्कूल बसची काच फुटली , ४ मुलं खाली पडून गंभीर जखमी 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन : औरंगाबादमध्ये धावत्या स्कुल बसमधून चार मुलं खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चारही मूलं गंभीर जखमी झाली आहेत . या जखमी मुलांना उपचाराकरिता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , औरंगाबाद येथील नगरनाका-लोखंडी पुलावर बस आली असता बसच्या मागील बाजूची काच फुटली . या काचेतून चार मुलं खाली पडली.

या बसमध्ये १०० मुलं होती. या विद्यार्थ्यांना  लसीकरणासाठी स्कूल बसमधून नेलं जात होतं , अशी माहिती आहे.चारही विद्यार्थ्यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. छावणी परिसरातील शांताबाई विद्यालयाची ही बस असल्याचे समजते.