चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान ; अद्यापही कारवाई सुरु 

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मिरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. येथे शोपियांमध्ये सुरक्षा रक्षकांत आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान सुरू असणाऱ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. शोपियांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती, तेव्हा भारतीय लष्कराने शोध मोहीम सुरू केले असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. तर येथे अजूनही चकमक सुरू आहे. या परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्काराच्या जवानांनी परिसराला घेरून शोधमोहीम राबवली. बतागुंड परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शुक्रवारीच शोपियामध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्या लोकांनी एका माजी विशेष पोलीस अधिकाऱ्यासह (एसपीओ) तीन लोकांचे अपहरण केले होते. तर गेल्याच आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांचे खबरी असल्याच्या संशयावरुन दोन लोकांची हत्या केली होती. याआधी शुक्रवारी अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी थेट श्रीनगरच्या मध्यभागात असलेल्या लालचौक परिसरात बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये जवळपास 10 दहशतवादी उपस्थित होते. बैठकीनंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद उर्फ हनजल्लानं या भागातील सेल्फीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

राफेल ‘चोरी’ मुळे फ्रान्स सरकार अडचणीत