Phone ने करत असाल पेमेंट तर जाणून घ्या कामाची गोष्ट, Fraud पासून रहाल दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळ (NPCI) देशात किरकोळ पेमेंट आणि निपटारा प्रणालीच्या कामकाजासाठी एक समग्र संस्था आहे. हा रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशन (IBA) चा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतात एक मजबूत पेमेंट आणि निपटारा संरचना निर्माण करणे आहे. fraud on phone upi transactions increase to rs 547 lakh crore in june upi transactions hit all time high in june as second wave ebbed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय आहे UPI पेमेंट
Npci चे यूनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) अनेक बँक खात्यांना एका मोबाइल अ‍ॅप्लिकेशनशी जोडून आर्थिक व्यवहारासाठी मदत करते.

असा बचाव करा Fraud पासून
Covid 19 च्या काळात सायबर क्राइम वाढत आहे. जर कुणी तुमच्याकडून OTP, UPI PIN, कार्ड डिटेल मागितल्या तर त्या कुणाशीही शेयर करू नका. शेयर केल्यास बँक खाते रिकामे होईल.

कशी होईल फसवणूक
जेव्हा एखादा ग्राहक बँकिंग माहिती एखाद्या सायबर गुन्हेगारासोबत शेयर करतो तेव्हा Fraud करणारा हा गुन्हेगार त्याचा व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस तयार करतो आणि त्याद्वारे बँक अकाऊंट UPI सोबत लिंक करू शकतो. याद्वारे तो सहजपणे तुमच्या बँक अकाऊंटमधून किंवा कार्डमधून पैसे काढू शकतो. RBI यासाठी ग्राहकांना अलर्ट करत असते.

काय आहे VPA
VPA म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस. हा यूपीआय आयडीप्रमाणे आहे.
VPA केवळ सायबर गुन्हेगारच जनरेट करतात. व्हीपीएद्वारे गुन्हेगार ग्राहकांना पेमेंटची लिंक पाठवतात.
आता ग्राहक ती लिंक न तपासता तिच्यावर क्लिक करतात आणि आपला यूपीआय PIN नोंदवून पेमेंट करतात, तेव्हा ग्राहकांची फसवणूक होते.

Web Titel : fraud on phone upi transactions increase to rs 547 lakh crore in june upi transactions hit all time high in june as second wave ebbed