अमिताभपासून अदनानपर्यंत आणि रितेशपासून करण जोहरपर्यंत सर्वांनीच वाहिली जेटलींना श्रध्दांजली !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज अखेर त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. नोटबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय जेटलींनी आपल्या कारकिर्दीत घेतले होते. एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करून अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्सनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत लिहिले आहे की, अरुण जेटली यांच्या निधनामुळे मला अतिशय दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

अभिनयापासून राजकारणात गेलेले शॉटगण शत्रुघन सिंन्हा म्हणतात जेटलींचे नेतृत्व खूपच भारी होते, त्यांच्या परिवाराला हे सहन करण्यासाठी ईश्वर ताकत देवो

धर्मा प्रोडक्शनचे मालक आणि निर्माता करण जोहरने म्हटले आहे की, आज देशाने एक चांगला नेता गमावला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

अभिनेता आणि खासदार सनी देओलने ट्वीट केले आहे की, देशाने आज आणखी एक चांगला नेता गमावला. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

गायक अदनान सामीने ट्वीट करत लिहिले आहे की, अरुण जेटली यांच्या निधनाच्या बातमीने मला खूप वाईट वाटले. ते खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like