धक्कादायक ! घरातूनच ती चालवत होती सेक्स रॅकेट ; पती, मुलीला बसला जबर धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पती नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात निघून गेले. मुलगीही कॉलेजला गेली. त्यानंतर तिने आपला व्यवसाय सुरु केला. गुन्हे शाखेला या तिच्या व्यवसायाची माहिती मिळाल्यावर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व त्यानंतर छापा घालून एका ५६ वर्षाच्या महिलेला रंगेहाथ तिच्याच घरात रेक्स रॅकेट चालविताना पकडले. ही गोष्ट जेव्हा तिचा पती आणि मुलीला समजले, तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. आपल्या मागे आई हे काही असे करत असेल, याची त्यांना काहीही कल्पना नव्हती.

चारकोप पश्चिमेच्या सेक्टर २ मधील एका टु बीएचके फ्लॅटमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय सुरु होता. ही महिला पती व मुलीबरोबर राहते. पतीचे पार्टनरशिपमध्ये एक दुकान आहे. तर, मुलगी कॉलेजमध्ये शिकत आहे. ही महिला पूर्वी विमा कंपनीमध्ये नोकरीला होती. त्यामुळे तिच्या संपर्कात अनेक जण होते. अनेकांची तिला माहिती होती. नोकरी सोडल्यानंतर ती घरीच असे. पती, मुलगी गेल्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ती घरातच वेश्या व्यवसाय करायची.

तिने व्हॉटसअ‍ॅपवरुन पूर्वीच्या संपर्कात असलेल्या मुलींशी पुन्हा संपर्क केला. त्यानंतर तिने ग्राहकांची माहिती मिळविली. ती मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवत. मुलीचे फोटो पसंत पडल्यानंतर  ग्राहकाला घरी बोलावून संबंधित मुलीची घरीच भेट घडवून आणत. त्यांना घरातील दोन पैकी एक बेडरुमचा वापर करायला देत असत. ग्राहकांची संख्या वाढल्याने ही बाब पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला.

आरोग्यविषयक वृत्त