उद्यापासून ससून रुग्णालयातील सर्व परिचारिका बेमुदत संपावर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन
ससून रुग्णालयातील 10 परिचारिकांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. याच्या निषेधार्थ उद्या पासून ससून रुग्णालयातील सर्व परिचारिका बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय परिचारिका संघटनेकडून घेण्यात आला आहे.
बी.जे.महाविद्यालयात स्टायपेंड वाढीच्या मुद्द्यावर शिकाऊ डॉक्टर मागील पाच दिवसापासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असताना.आता परिचारिका देखील उद्या पासून संपावर गेल्यावर रुग्णाना आणखी त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मात्र आता या दोन्ही संपावर ससून रुग्णालय प्रशासन कशा प्रकारे उपाय करते हे पाहावे लागणार आहे.
परिचारिकांच्या संपा विषयी त्यांच्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या की,राज्य शासनाची 14 वैद्यकीय रुग्णालय असून या कोणत्याही रुग्णालयात परीचारिकांची बदली झाली नाही. मात्र ससून रुग्णालयातील 10 परिचारिकाची बदली करण्यात आली आहे. या बदल्या वरिष्ठांच्या अाकासापोटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बदल्याचा त्यांनी निषेध देखील केला.या संपामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये 600 महिला काम करतात. संपात या सर्व सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत या बदल्या रद्द करित नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.