एक्साईजमध्ये वाढ करुन केली लूट, राज्यातील 32 जिल्ह्यात पेट्रोल वाढ; अशोक चव्हणांनी ग्राफ शेअर करत केली केंद्रावर टीका

मुंबई : पोलीसनामाऑनलाइन – देशात इंधन दरवाढीचा (Fuel price hike) भडका उडाला आहे. दररोज इंधन दरवाढ होत असल्याने नागरिकांचे बजेट कोलमडलं आहे. राजधानी दिल्लीत (Capital Delhi) पेट्रोल (Petrol) 95 तर डिझेल (Diesel) 86 रुपयांवर पोहचले आहे. तर देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा (Maharashtra) देखील समावेश आहे. इंधन दरवाढी (Fuel price hike) वरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. केंद्राने एक्साईजमध्ये (Excise) वाढ करुन ग्राहकांची लूट केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

म्हणून पेट्रोलचे दर शंभरीपार

अशोक चव्हाण म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किंमती (Crude oil prices) कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये वाढ करुन लूट केली. म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वीदत पोहोचले आहे.

4 मे पासून 20 वेळा दरवाढ

अशोक चव्हाण यांनी इंधन दरवाढ संदर्भात एक ग्राफ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये राज्यातील 32 जिल्ह्यांत पेट्रोल दरवाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षापासून झालेली पेट्रोल दरवाढीची आकडेवारी या ग्राफ मध्ये देण्यात आली आहे. 4 मे पासून 20 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. म्हणून राज्यातील इंधन दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे.

पेट्रोलचा दर 101.3 रुपये

पेट्रोल लिटरला 100 रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे देशातील पहिले महानगर ठरले. मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलचे दर शंभरच्या वर पोहोचले. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला 101.3 रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे 93.35 रुपये मोजावे लागत आहेत.

हे देखील वाचा

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, ….

CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; …

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा
Web Title :  center robbed the customers by increasing the excise duty says ashok chvhan