पेट्रोल, डिझेलमध्ये सलग १४ व्यांदा वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेससह विरोधकांनी पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात भारत बंद पुकारला होता. तरीही त्याकडे सत्ताधारी भाजपाने दुर्लक्ष केले. दोन्ही दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे़ गेल्या काही दिवसात सलग १४ व्या वेळा ही वाढ झाली आहे.

आज पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी ८८.२६ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही १५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर ७७.४७ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’456efe83-b590-11e8-95b6-c79d09ce0857′]
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी१४ पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे ८०.८७ रुपये आणि ७२.९७ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाचे दर वाढल्याने माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

…..तर पेट्रोल मिळेल ५५ रुपयांत नितीन गडकरी यांनी दाखविले स्वप्न