‘बलशाली’ भारतासमोर अमेरिका देखील ‘लाईन’वर ! काश्मीर प्रश्न हा ‘अंतर्गत’ मुद्दा, जी – 7 परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘स्पष्टीकरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींनी आज फ्रान्समध्ये सुरु असलेल्या जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काश्मीर आणि इतर अनेक मुद्यावर चर्चा झाली. या चर्चेत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की काश्मीर हा भारत पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे. ट्रम्प यांच्या स्पष्टीकरणानंतर मात्र पाकचा तिळपापड झाला आहे.

भारताला आणि पाकिस्तानला गरिबीशी लढायचे आहे –

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली, त्यांनी विश्वास दर्शवला की सर्व काही ठीक आहे. तर पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताला देखील गरिबीशी सामना करायचा आहे आणि पाकिस्तानला देखील गरिबीशी लढायचे आहे. आम्ही दोन्ही देश मिळून या समस्येच्या विरोधात लढू, आम्ही हा संदेश पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील दिला आहे. मोदी म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील काही परस्पर मुद्दे आहेत, कोणत्याही देशाला आम्ही यामुळे त्रास घेण्यास भाग पाडणार नाही.

आर्थिक मंदीवर चर्चा होण्याची शक्यता –

भारत जी – 7 समूहाचा भाग नाही, परंतू विशेष आमंत्रित सदस्य आहे. या जी – 7 वर आज जगभरातील नजरा होत्या. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि व्यापार युद्धासंबंधात मोठ्या चिंता आहेत. यावर सर्व जी – 7 सदस्य चर्चा करु शकतात आणि महत्वाचा निर्णय घेऊ शकतात. या बैठकीत पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि डिजिटल बदल यावर चर्चा होऊ शकते. जी-7 मध्ये फ्रान्स, जर्मनी, युके, इटली, अमेरिका, जपान आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या