गडचिरोली-तेलंगणाच्या सीमेवर सहा माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हयाच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या जंगलात आज (शुक्रवार) जवानांनी धाडसी कारवाई केली आहे. ग्रेहाऊंडसच्या आणि नक्सलवादी यांच्यात आज चकमक सुरु असून, या चकमकीत सहा माओवाद्यांना ठार केले आहे.

भोपालपल्ली जिल्ह्याच्या अन्नारम ते वेंकटापुरम दरम्यानची ही घटना आहे. तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रेहाऊंडसच्या जवानांनी ही कारवाई केली आहे. अजूनही ऑपरेशन सुरुच असून, आतापर्यंत या चकमकीत सहा माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे.

दरम्यान , नुकतेच सी-60 कमांडोंनी भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 माओवाद्यांचा खात्मा केला होता. संपूर्ण अहिरी दलम या संघटनेच्या माओवाद्यांचा यात समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजाराम खांदला भागात 6 माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं होतं. गेल्या आठवड्याभरात जवानांच्या कारवाईत जवळपास ४५ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे.