… म्हणून ‘गगनयान’मध्ये महिला अंतराळवीर नाही

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळात मानव पाठविण्यासाठीच्या गगनयान मोहिमेची तयारी सुरू केली आहे. इस्रोकडून मात्र या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश नसेल, कारण या मोहिमेसाठी इस्रो लष्करातील वैमानिकांना प्रशिक्षण देणार आहे आणि सध्यातरी कोणत्याही दलामध्ये त्या श्रेणीतील महिला वैमानिक नाही. अशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. यानात एका महिला अंतराळवीराचाही समावेश असणार आहे अशी माहिती इस्रोकडून जानेवारी महिन्यात देण्यात आली होती.

इस्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गगनयान मोहिमेसाठी संभाव्य अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण होईल. निवड झालेल्या वैमानिकांना नोव्हेंबरमध्ये रशियात प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. गगनयान मोहिमेसाठी भारताकडून रशियाबरोबरच फ्रान्सशीही सहकार्याचा करार करण्यात आला आहे. सन 2022 मध्ये गगनयानाचे पहिले उड्डाण होणार असून, तीन अंतराळवीर या यानात असतील. पहिल्या उड्डाणात महिला अंतराळवीर नसली तरी भविष्यातील उड्डाणांमध्ये सामन्य लोकांचा समावेश केला जाणार असून, त्यांच्यात महिलाही असतील

ADV

गगनयान मोहिम –

ही मोहीम इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असून इस्रो प्रथमच गगनयानात माणसाला अंतराळात पाठवण्याचा विचार करत आहे. या वर्षी गगनयानासाठी एक अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) बांधण्यात येणार आहे. त्यानंतर 2020 च्या डिसेंबरमध्ये पहिली परीक्षा मोहीम राबवण्यात येईल. त्यानंतर जुलै 2121 मध्ये पुढील मोहीम राबवली जाईल. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतरच गगनयान अवकाशात झेपावेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान मोहिमेला मंजुरी दिली आहे. या मोहिमेचा एकूण खर्च 10 हजार कोटी रुपये आहे.

अशी असेल मोहीम –

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) लवकरच त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या गगनयानाला अवकाशात सोडणार आहे. अंतराळात मानव पाठविण्याअगोदर डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 मध्ये दोन मानवरहित मोहिमा होणार आहेत. त्यासाठी अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात दिले जाईल आणि अद्यावत प्रशिक्षण रशियात होईल.

ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात माणसाला पाठवणारा भारत चौथा देश ठरेल. इस्रोने आजतागायत 17 अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. ज्यात 7 लाँच व्हेइकल आणि 9 अंतराळयानांचा समावेश आहे. यातील एक मोहीम दुर्दैवाने अयशस्वी ठरली आहे. 2018 मध्ये इस्रोने 2 जीएसएलव्ही आणि एमके-3 , जीसॅट-11 हा उपग्रह इत्यादींचे प्रक्षेपण केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –