कुख्यात गजानन मारणेचं स्वागत करणं भोवलं, 17 जणांना अटक; 200 जणांचा शोध सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका केल्यानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी पुणे आणि परिसरातील तब्बल 200 वाहनांचा ताफा कारागृहाबाहेर होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाका येथील फूड मॉल येथे फटाके वाजवून आणि आरडाओरडा करुन दहशत पसरवणाऱ्याचा प्रयत्न गजानन मारणे याच्या समर्थकांनी केला. याप्रकरणी पिपंरी चिंचवड पोलिसांनी मारणेच्या ताफ्यातील 17 जणांना बेड्या ठोकल्या असून 11 अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. अद्याप मुख्य आरोपी गजानन मारणे हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत. तर 150-200 जणांचा शोध घेण्यासाठी 9 तपास पथके तयार करण्यात आली असून त्यांच्या मार्फत फरार असलेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन उर्फ गज्या मारणे हा नुकताच तळोजा कारागृहातून सुटला आहे. त्याच्या स्वागतासाठी 200 वाहनातून त्याचे साथीदार आले होते. सुटका होताच फिल्मीस्टाईल रांगेत मोटारी चालवत एक प्रकारच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोल नाका येथील फूट मॉल येथे थांबून फटाके वाजवत आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. तसेच याचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले. याप्रकरणी गजानन मारणेसह ताफ्यातील 30-40 गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एक ड्रोन, 11 महागड्या अलिशान गाड्या 12 मोबाईल जप्त केल्या आहेत. तसेच 150 ते 200 वाहने व आरोपी यांना अटक करण्यासाठी 9 तपास पथके तयार करण्यात आली असून क्राईम ब्रॅच व तांत्रिक विश्लेषणची विशेष टिम तयार करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने फरार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

सागर सुखदेव थिटमे (वय -25 रा. धायरी), संतोष चंद्रकांत शेलार (वय-36 रा. कोंढवे धावडे), रघुनाथ चंद्रकांत किरवे (वय-49 रा.भोर), सागर वसंत शेडे (वय-29 रा. कोंडवे धावडे), मावली रामदास सोनार (वय-20 रा. कोंढवे धावडे), आशिष वसंत अवगडे (वय-23 रा. उत्तम नगर) यांना 19 फेब्रुवारी रोजी अटक केली. तर व्यंकटेश व्यंकट्या स्वर्पराज (वय-36 रा. धानोरी), मयुर अर्जुन गाडे (वय-21), अनिल राजाराम मदने (वय-42 रा. औंध), शुभम मनोहर धुमणे (वय-23 रा. धानोरी), शैलेश रविंद्र गावडे (वय-30 रा. चिंचवड), अखिल जवंत उभाळे (वय-27 रा. विश्रांतवाडी), अभिजित विजय घारे (वय-35 रा. बेबड ओव्हळ), अनिल संपत जाधव (वय-37 रा. पुरंदर), निलेश रामचंद्र जगताप (वय-39 रा. पुरंदर), रोहन अर्जुन साठे (वय-34 रा. येरवडा), योगेश राम कावले (वय-28 रा. चिंचवड) यांना शनिवारी (दि. 20) अटक करण्यात आली.

फरार आरोपींची नावे

गजाजन पांडुरंग मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन अप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार, अनंता ज्ञानोबा कदम, प्रदिप दत्तात्रय कंदारे, बापु श्रीमंत बाबर, गणेश नामदेव हुंडारे, सुनिल नामदेव बनसोडे या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, शिरगाव परंदवडी पोलीस चौकी व टिम तपास करीत आहेत.