‘गंदी बात 4’ मधील गरिमा जैनचा BOLD अंदाज, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ALT Balaji ची लोकप्रिय आणि अत्यंत बोल्ड वेब सीरिज ‘गंदी बात’ चा सीझन 4 ऑनलाईन प्रदर्शित झाला आहे. गंदी बात सीरीजला पाहणारे दर्शक बराच काळ वाट पाहत होते. एकता कपूरच्या या वेब सीरिजमध्ये गरिमा जैनसुद्धा खास भूमिकेत दिसणार आहे. गरिमा जैनने 2015 मध्ये टेलीव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते ‘दोस्ती यारियां मनमर्जियां’ या मालिकेनंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.

गरिमा जैन ‘शक्ती: अस्तित्व के अहसास’ या मालिकेसाठी ओळखली जाते. गरिमा आता ‘गंदी बात 4’ मध्ये दिसणार आहे. या मालिकेत ती खूपच हॉट आणि बोल्ड सीन करताना दिसत आहे. गरिमा जैन हिने आपल्या बोल्ड भूमिकेबद्दलचे अनुभव शेअर केले आहे.

गरिमाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘सीजनच्या कॉन्ट्रॅक्टवर साइन करण्याआधी माझे काही मुद्दे होते. स्क्रिप्टला खूप साऱ्या बोल्ड सीनची गरज होती आणि यासाठी मी तयार नव्हते. मला न्यूडिटी आवडत नव्हती. यानंतर मेकर्ससोबत चर्चा केल्यानंतर मी तयार झाले. मी यामध्ये काम केल्यामुळे खुश आहे. यामध्ये मी अनेक किसिंग आणि हॉट सीन दिले आहे.’

काही महिन्यांपासून बोल्डनेस आणि बोल्ड कथांना चांगलेच पसंत केले जात आहे. टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर देखील डिजिटल माध्यमाची राणी बनली आहे. ‘ ‘गंदी बात’ ही तिच्या सुपरहिट वेब सीरिजपैकी एक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/