पुणे शहरात गणेश मंडळाचे परवाने आता एका क्लिकवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरात सार्वजनिक गणोशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. उत्सव निर्विघ्न साजरा होण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशात पुणे शहर पोलीस दल व पुणे मनपा गणेश मंडळाचे नियमन व कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. यासाठी पुणे शहर पोलीस व पुणे मनपा कडून उत्सव काळात परवाने दिले जातात. पुणे शहर व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंडळांना ऑनलाईन परवाना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे मंडळांना घरबसल्या 24 तास आपला परवाना अर्ज सादर करता येईल व वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याचा वेळ वाचणार आहे. या प्रणालीत पुणे शहर पोलीस दलातील सर्व वाहतुक शाखा, मनपाची सर्व क्षेत्रिय कार्यालये व सर्व पोलीस स्टेशन एकत्रित जोडण्यात आलेली असून एकाच अर्जात हे तीनही परवाने मिळवणे मंडळांना शक्य होणार आहे.

सदर प्रकिया ही पुणे पोलीस आयुक्त श्री. के. व्यंकटेशन, मा.महापौर, मनपा आयुक्त श्री. सौरभ राव, पोलीस उपायुक्त श्री. अशोक मोराळे, मनपा उपायुक्त श्री. माधव जगताप यांच्या सहकार्याने कार्यान्वीत करण्यात आली असून सर्व वाहतुक शाखा अधिकारी, क्षेत्रिय मनपा निरीक्षक, पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या नियमनात राबवण्यात येत आहे.

आळंदी, चाकण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या नेमणूका

ऑनलाईन परवाना मिळवण्याची पद्धत
http://punepolice.co.in/online-parwana या लिंकवर परवाना अर्ज उपलब्ध आहे.
1) अध्यक्ष / पदाधिकारी SMS OTP पडताळणी.
2) मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने अकाउंट बनवणे.
3) अर्ज भरताना शक्यतो डेस्कटॉप कॉम्पुटरचा व अद्ययावत Browser चा वापर करावा.
4) युजर नेम हा अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असेल व पासवर्ड आपण निवडल्याप्रमाणे ठेवता येईल.
5) अर्ज ऑनलाईन भरताना फक्त इंग्रजी (English) मधेच भरावा.
6) अर्ज टप्प्या टप्प्याने भरता येईल कुठेही काही तांत्रिक अडचण आल्यास याची मदत होईल.
7) ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे.
8) अर्ज भरल्यावर अर्ज क्रमांक नोंद करा व अर्जाची प्रत डाउनलोड करा.
या प्रकारे अर्ज सादर करून मंडळांना ऑनलाईन परवाने उपलब्ध होणार आहेत.
सर्व प्रथम वाहतुक नाहरकत त्यानंतर मनपा परवाना व शेवटी पोलीस स्टेशनचा परवाना मिळणार आहे. अशा प्रकारे मंडळांना ऑनलाईनच परवाने दिले जाणार आहेत. शहरातील जास्तीत जास्त मंडळानी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे शहर पोलीस व पुणे मनपा यांच्याकडून करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी तांत्रिक यंत्रणा रोला टेक्नोलाॅजीचे संचालक अविराज मराठे व त्यांची टीम पुरवत आहे.