Ganeshotsav 2022 | ‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस ! शंकर महादेवन यांचा श्रवणीय आवाज

नीरज करंदीकर यांचं अवीटगोडीचे भावमधुर संगीत , तर डॉ. संगीता बर्वे यांचे तितकेच भावपूर्ण शब्द.

 

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ganeshotsav 2022 | गणपतीची गाणी आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे एक अनोखं समीकरण बनलं आहे. आता या समीकरणाची आणखी एक सुंदर कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. संगीतकार नीरज करंदीकर यांच्या सुमधुर संगीताने बाप्पाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला आलं आहे. तसेच डॉ. संगीता बर्वे यांच्या शब्दांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवात ‘हे गणराया जीवा लागला तुझ्या कृपेचा ध्यास ’ हे गाणं सगळीकडे ऐकू येणार हे नक्की. (Ganeshotsav 2022)

 

गणेशस्तुती हा रसिकांच्या पसंतीचा विषय आहे. शब्द, संगीत आणि गायन ह्याचा त्रिवेणी संगम या गाण्यात आपल्याला दिसून येईल . कलेची देवता असलेल्या अधिपती गणपती बाप्पाला या गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा या सर्व कलाकारांनी पोहोचवली आहे. श्रवणीय संगीत, शब्दमधुर गीत आणि शंकरजींच्या आवाजातला गोडवा नक्कीच बाप्पापर्यंत पोहोचणार आणि बाप्पाच्या आशीर्वादाने अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडत जाणार. (Ganeshotsav 2022)

 

 

संगीतकार नीरज करंदीकर यांनी यापूर्वीही दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
आशा भोसले, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, देवकी पंडित बेला शेंडे, आर्या आंबेकर यांच्यासाठी नीरज यांनी यापूर्वी संगीत दिलेले आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने नीरज यांनी गायिका प्रियांका बर्वे ह्यांनी गायलेल्या गाण्याला संगीतबद्ध केले होते.

 

हे गाणं तुम्हाला Gaana, Spotify, Amazon Music, JioSaavn, Apple Music, WynkMusic या म्युझिक अॅपवर ऐकता येईल, तसेच कडकभक्ती या युट्यूब चॅनलवर बघता येईल.

 

Web Title :- Ganeshotsav 2022 | Hey Ganaraya Bappa’s song to the audience! The audible voice of Shankar Mahadevan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 लाभार्थी, अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

 

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल