TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 लाभार्थी, अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात (TET Exam Scam) नेत्यांची नावे समोर आली आहेत. टीईटी परीक्षा घोटाळामुळे वादात अडकलेले शिंदे गटाचे (Shinde Group Minister) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये (TET Exam Scam) सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची नावं आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Legislative Council Opposition Leader Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी केला आहे.

 

टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे (TET Exam Scam) अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मुलांची नाव टीईटी परीक्षेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आल्याचे समोर आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा होती. मात्र अखेरच्या क्षणी सत्तार यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. आज अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या संस्थेतील दहा ते बारा जणांची नावे आहेत. या प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात टीईटी घोटाळ्याचा विषय बारकाईने मांडला होता. यावर चौकशी सुरु झाल्या आहेत. मात्र ती चौकशीही संशयास्पद दिसत आहे. सरकार उघड्या डोळ्यांनी का बघतंय. टीईटी घोटाळ्यात मंत्री आहेत की नाही हे तपासावे, तोपर्यंत मंत्री पदावर त्यांना ठेऊ नये, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

मेट्रो-3 च्या कारशेडला (Metro-3 Carshed) महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) विचार करुन स्थगिती दिली होती.
आता या सरकारने सुरु केली आहे. मात्र, फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात
इगो मुळे मेट्रो थांबली होती, परंतु इगो यात त्यांचाच दिसतोय.
आमची भूमिका जंगल, आदिवासी वाचावे असाच होता. महाराष्ट्रात अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
परंतु बुलेट ट्रेन सुरु करण्याची धडपड आहे.
इगो त्यांचाच आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याचा पलटवार दानवे यांनी केला.

 

Web Title :- TET Exam Scam | 10 to 12 beneficiaries of sattars institute ambadas demons alleged in tet exam scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

 

Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल