Ganeshotsav 2022 | उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तरी गणेशोत्सव निर्बंधमुक्त केला असता – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यात प्रत्येक सणावर निर्बंध (Corona Restrictions) घालण्यात आले होते. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) राज्यात मोठ्या उत्साहात आणि निर्बंधमुक्त साजरा होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर (Ganeshotsav 2022) कोणते निर्बंध नाहीत. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये (Ganesha Devotees) उत्साहाचे वातावरण आहे. मागील दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. गणपती विसर्जनासाठी (Ganpati Immersion) राज्य सरकार, स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील गणपतीचे दर्शन घेतले.

अजित पवार यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) विविध गणपतींचे दर्शन घेतले. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार (Uddhav Thackeray Government) असतं तरी गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्बंधमुक्त केला असता. पण त्या वेळी माणसं जगवणं महत्वाचं होतं. त्यामुळे निर्बंध लावले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला होता. दुर्दैवाना राज्यात आणि काही प्रमाणात केरळमध्ये संख्या जास्त होती. ही संख्या नियंत्रणात आणण्याची म्हटले तर निर्बंध लावावे लागत होते, म्हणून ही बंधनं होती. आता ही बंधने हटवण्यात आली आहेत. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचे पवार म्हणाले.

गणपती दर्शनानंतर बाप्पाकडे काय मागितलं ? असे विचारले असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. प्रत्येकवेळी गणपतीचं दर्शन घेतले की काहीतरी मागितलंच पाहिजे का? सारखं सारखं त्यांना साकडं घालण्यात काही अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ganeshotsav 2022 | opposition leader ncp leader ajit pawar on ganeshotsav festival anant chaturdashi pune news today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati Love Jihad Case | अमरावती कथित लव्ह जिहाद प्रकरण ! तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

Brahmastra Movie Review | ‘ब्रह्मास्त्र’ प्राचीन भारतीय इतिहासाचा आधार घेऊन केलेला एक मोठा प्रयोग, 8 वर्षांची मेहनत, 400 कोटींचे बजेट