Gangajal | ‘कोरोना’च्या उपचारात परिणामकारक ठरू शकते ‘गंगाजल’, काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) तज्ज्ञांनी केला दावा

नवी दिल्ली : Gangajal | काशी हिंदू विद्यापीठाचे (BHU) न्यूरोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर व्ही. एन. मिश्रा (Doctor V. N. Mishra) आणि डॉक्टर अभिषेक पाठक (Doctor Abhishek Pathak) यांनी दावा केला आहे की, गंगाजल कोविड-19 च्या उपचारात परिणामकारक ठरू शकते. येथे प्रेस क्लबमध्ये रविवारी पत्रकारांशी बोलताना या तज्ज्ञांनी म्हटले की, हिमालयाच्या गंगोत्रीमधून निघणार्‍या गंगामध्ये ‘बॅक्टेरियोफेज’ (Bacteriophage) भरपूर प्रमाणात असतात (Gangajal for corona treatment).

बॅक्टेरियोफेज शब्दाचा अर्थ बॅक्टेरियाला नष्ट करणारा, असा होतो. गंगा नदीत आढळलेले बॅक्टेरियोफेज हे बॅक्टेरिया आणि विषाणूंना नष्ट करतात. ज्यामुळे गंगा नदीच्या पाण्याची शुद्धता कायम राहते. गंगा नदीत बॅक्टेरियोफेज असण्याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, गंगाजलमध्ये सुमारे 1300 प्रकारचे बॅक्टेरियोफेज आढळून आले आहेत जे कोणत्याही नदीच्या तुलनेत जास्त आहेत.

यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता (Senior Advocate of Allahabad High Court Arun Kumar Gupta) यांनी म्हटले की, जलशक्ती मंत्रालय (Ministry of Water Power) अंतर्गत जल संसाधन विभागाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनने गंगाजलच्या उपचारातील वापराबाबत क्लिनिकल संशोधन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यांनी म्हटले की, गंगाजलद्वारे कोविड-19 च्या उपचारासंबंधी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक
याचिका सुद्धा दाखल केली आहे ज्यावर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला नोटीस जारी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

High Court | पत्नी छळ करत असेल तर पतीला निश्चितपणे वेगळे होण्याचा अधिकार – हाय कोर्ट

COVID-19 in India | कोरोनाचा ‘ग्राफ’ होतोय वर-खाली, देशात गेल्या 24 तासात आढळले 27254 नवीन रूग्ण, 219 जणांचा मृत्यू

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gangajal | gangajal or ganga water can prove to be effective in the treatment of corona claim bhu experts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update