COVID-19 in India | कोरोनाचा ‘ग्राफ’ होतोय वर-खाली, देशात गेल्या 24 तासात आढळले 27254 नवीन रूग्ण, 219 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : COVID-19 in India | देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा भितीदायक दिसत आहे. दररोज कोरोनाचा (Corona) ग्राफ वर-खाली जात आहे. कोरोनाची प्रकरणे वाढलेली असतानाच देशात व्हॅक्सीनेशन अभियानाचा (Vaccination Campaign) वेग वाढवण्यात आला आहे. केरळ (Kerala) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) ज्या वेगाने कोरोना रूग्णांची (COVID-19 in India) संख्या वाढत आहे ती पाहता तिसर्‍या लाटेचा इशारा खरा ठरताना दिसत आहे.

एकुण संक्रमित 3 कोटी 32 लाख 64 हजार 175

आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकड्यांवर नजर टाकली तर मागील 24 तासात देशात कोरोना संसर्गाची 27 हजार 254 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 219 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवीन रूग्ण आढळल्यानंतर आता देशात एकुण संक्रमितांची संख्या 3 कोटी 32 लाख 64 हजार 175 झाली आहे.

Pune Big Basket Godown Fire | पुण्याच्या बावधनमधील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग; 2 लाखाच्या नोटा जाळून खाक तर 8 लाख वाचवले

एकुण मृत्यू 4 लाख 42 हजार 874

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 लाख 74 हजार 269 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर 3 कोटी 24 लाख 47 हजार 32 लोक बरे होऊ घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनाने 4 लाख 42 हजार 874 लोकांचा मृत्यू झाला आहे.

74,38,37,643 लोकांनी घेतली व्हॅक्सीन

देशात आतापर्यंत 74,38,37,643 लोकांना व्हॅक्सीन दिली गेली आहे. मागील 24 तासात 53,38,945 लोकांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली आहे.

आकड्यांमध्ये पहा राज्यांची कोरोना स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची 3,623 नवीन प्रकरणे

महाराष्ट्रात रविवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 3,623 नवीन प्रकरणे समोर आली, ज्यानंतर एकुण प्रकरणे वाढून 64,97,877 झाली. आरोग्य विभागानुसार, महामारीमुळे आणखी 46 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची एकुण संख्या 1,38,142 वर पोहचली आहे.

राज्यात आतापर्यंत कोविड-19 ने पीडित झाल्यानंतर एकुण 63,05,788 लोक बरे झाले आहेत. राज्यात मृत्युदर 2.12 टक्के आहे आणि बरे होण्याचा दर 97.04 टक्के आहे. सध्या 50,400 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

केरळ

– शनिवार कोविड-19 के 20,240 नवीन प्रकरणे आली

– आणखी 67 रूग्णांचा मृत्यू झाला.

तमिळनाडु

– मागील 24 तासात 1,639 नवीन प्रकरणे

– आणखी 27 लोकांचा मृत्यू

आसाम

– 259 नवीन प्रकरणे

– 11 लोकांचा मृत्यू

हे देखील वाचा

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

CBDT Tax Refund | सीबीडीटीने 70 हजार कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड केला जारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Covid 19 in india | covid 19 in india india witnessed 27254 new corona case and 219 death in past 24 hour

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update