गंगूबाई काठियावाडीचं करीम लालासोबत होतं ‘पावरफुल’ कनेक्शन, त्यामुळंच बनली मुंबईची ‘माफिया क्वीन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईचा डॉन करीम लालाला भेटत असे. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

करिम लाला, मस्तान मिर्झा उर्फ हाजी मस्तान मुंबईचे पॉवरफुल डॉन होते. करीम लाला असा होता ज्याला मुंबईचा पहिला माफीया डॉन म्हणून ओळखलं जातं. करीम लाल 1960 पासून 80 च्या दशकात सक्रिय होता. करीम लालाच्या गँगचं नाव पठाण गँग होतं. असं म्हटलं जातं की, करीम लालाचं फीमेल डॉन गंगुबाईसोबत जिव्हाळ्याचं नातं होतं.

असं सांगितलं जातं की, गंगुबाई गुजरातच्या काठीयावाडची रहिवासी होती. तिचं खरं नाव गंगा हरजीवनदास काठीयावाडी होतं. 16 वर्षांची असतानाच गंगुबाईला आपल्या विडलांच्या 29 वर्षीय अकाऊंटटवर प्रेम झालं. गंगुबाईला अभिनेत्री व्हायचं होतं. तिला अभिनेत्री बनवण्याचं स्वप्न दाखवत अकाऊंटंटनं तिच्यासोबत लग्न केलं. दोघेही पळून मुंबईला गेले. परंतु त्यानं तिला फसवलं. त्यानं तिला मुंबईतील कामाठीपुरा रेड लाईट एरियात अवघ्या 500 रुपयांना विकलं.

माफीया क्वीन ऑफ मुंबई या हुसैन जैदी यांच्या पुस्तकानुसार, याच दरम्यान मुंबईचा माफीया डॉन करीम लालाच्या गँगमधील एकानं गंगुबाईचा रेप केला. करीम लालाच्या घरी दरबार भरत असे जिथे तो लोकांचं म्हणणं ऐकायचा आणि तिथेच त्याच्यावर तोडगा काढायचा. सबका मसीहा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. त्याच्या दरबारातील अनेक समाजातील आणि संप्रदायातील लोक मदत मागण्यासाठी येत असत. तिथे गरीब श्रीमंत असा काही भेद नव्हता.

गंगुबाईनं देखील करीम लालाला भेटून न्याय मागितला. असंही म्हटलं जातं की, गंगुबाईनं करीम लालाला राखी बांधून भाऊ बनवलं होतं. करीमची बहिण बनल्यानं गंगुबाईकडे पॉवर आली होती. गंगुबाई कामाठीपुरामधील रेड लाईट भागात सेक्स रॅकेट आणि कोठे चालवत होती. ती सेक्स वर्कर्ससाठी आवाजही उठवत असे. तिच्या डोक्यावर करीम लालाचा हात होता त्यामुळे मुंबईमधील फीमेल डॉनपैकी एक बनली.

संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठीयावाड हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या माफीया क्विन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारीत आहे. या सिनेमात गंगुबाईचा रोल आलिया भट्ट साकारत आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार सिनेमात करीम लालाचाही उल्लेख असेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/