Gangster Nilesh Ghaiwal | गँगस्टर नीलेश घायवळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या प्रकरण

पुणे : कुख्यात गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ (Gangster Nilesh Ghaiwal) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला असून त्याच्या विरोधात करण्यात आलेली अटकेची कारवाई रद्द केली आहे.  घायवळ (Gangster Nilesh Ghaiwal) हा तडीपार असताना त्याने भिगवण परिसरात गुन्हा केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ॲक्टिव्हिटी (एमपीडीए) नुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती. त्याला स्थानबद्ध करून त्याची येरवडा कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली. याबाबचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जमादार आणि एस. एस. शिंदे यांनी दिले आहेत.

अटक रद्द करण्यासाठी त्याने अ‍ॅड. सत्यव्रत जोशी (Adv Satyavrat Joshi) आणि अ‍ॅड. सुमंत देशपांडे (Adv Sumant Deshpande) यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अपहरण, असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. या गुन्ह्यात 2020 मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर ही त्याने भिगवण परिसरात खंडणी व अपहरण केल्याचा गुन्हा केला. त्यामुळे त्याच्या विरोधात एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी घायवळ याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यास परवानगी दिली. त्यानुसार घायवळ याला जामखेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.

पुणे ग्रामीणमध्ये (Pune Rural Police) गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी जोरदार कारवाई सुरू केली आहे.
गेल्या वर्षात अनेक टोळ्यातील गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

PMPML | खुशखबर ! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांना ‘पीएमपी’ने दिली ‘ही’ विशेष सवलत, जाणून घ्या

Maharashtra Police News | बदली करा नाहीतर आत्मदहन, इशारा देऊन कर्मचारी ‘गायब’, पोलीस दलात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gangster Nilesh Ghaiwal | Mumbai High Court gives relief to gangster Nilesh Ghaiwal, find out the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update