Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावनांचा विचार करुन अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मंडळ, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणेश मंडळांचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ganpati Immersion 2023 | अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मंडळ, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणेश मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावनांचा विचार करुन दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहोत, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ganpati Immersion 2023)

या पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे व श्री जिलब्या मारुती गणेश मंडळ ट्रस्टचे भूषण पांड्या उपस्थित होते. (Ganpati Immersion 2023)

अण्णा थोरात म्हणाले, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करती सर्व शिस्त पाळून लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्याचा प्रयत्न सर्व मंडळांचा राहणार आहे. दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे मंडळांना शक्य होत नाही. मानाच्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीनंतर इतर गणपती मंडळे लक्ष्मी रोडने मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होतील. त्यामुळे ती मंडळे पुढे जाईपर्यंत इतर मंडळांना लवकर जाणे शक्य नाही. त्यासाठी आम्ही नेहमीच्या वेळेतच सहभागी होणार आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, विसर्जन मिरवणुकीकरिता सायंकाळी सहभागी
होत असलेल्या प्रमुख मंडळांनी केलेली सजावट व विद्युतरोषणाई हे सायंकाळ नंतरचे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते.
ते पाहण्यासाठी लाखो भाविक देशभरातून नाही तर जगभरातून येतात.
त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांचा विचार करता ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोत.
तसेच सर्व प्रकारची शिस्त पाळत विसर्जन मिरवणूक होईल.

हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे म्हणाले, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाची सजावट व विसर्जन
रथ हे आकर्षण असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मंडळ यंदा देखील सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
उत्सव मंडपासून सायंकाळी 6.45 वाजता आरती करुन विसर्जन मिरवणुकीत मंडळ सहभागी होईल.

भूषण पांड्या म्हणाले, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ सांयकाळी 6.30 नंतर मिरवणुकीमध्ये सहभागी होईल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळा मागे हुतात्मा बाबू गेनू गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गंणपती आणि
त्यानंतर अखिल मंडई मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल. भाविकांच्या भावनांचा विचार करुन आम्ही हा
निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड