Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप (BJP) प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजब सल्ला दिला. याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असे विधान केले आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब – सुप्रिया सुळे

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच, पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

पत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजताय का? – वडेट्टीवार

बावनकुळे यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का?
देशातील 12 पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही.
दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे.
त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही
समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी
निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की… पण जनता 2024 मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार