Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Eknath Khadse | राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला त्यांच्यासोबत येण्यासाठी विचारलं होतं. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा फोन आला होता. परंतु आपण शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची साथ सोडणार नाही असा गौप्यस्फोट केला. आता यावर अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मी काही असे विचारलं नाही की मधला माणूस नाही. मला विचारायचे असेल तर मी डायरेक्ट विचारेल. अजित पवारला मध्यस्थी लागत नाही, असे अजित पवार (Ajit Pawar On Eknath Khadse) यांनी सांगितले.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे आमच्याकडे येण्यासाठी आग्रही असून खडसे अजित पवारांना बोलले हे मला माहीत आहे. खडसेंनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावं असं विधान महाजन यांनी केलं होतं. महाजन यांच्या या विधानावर खडसे यांनी स्पष्टीकरण देताना अनेक गौप्यस्फोट केले होते.

एकनाथ खडसे म्हणाले, मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. मी अजित पवारांसोबत नाही. मला अजित पवारांनी विचारलं होतं. मला मिटकरी यांचा फोन आलेला पण मी स्पष्ट शब्दात सांगितले कुठल्याही परिस्थितीत आम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही, असे खडसेंनी म्हटले. त्यांच्या या विधानावर उत्तर देताना अजित पवारांनी आपण असे काही विचारलं नसल्याचे स्पष्ट केलं. (Ajit Pawar On Eknath Khadse)

नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पाण्याचा निचरा कसा होतोय हे पाहिले पाहिजे.
प्रशासनाने अनेक गोष्टी बघून केल्या पाहिजे. दोष कोणाला देऊ नये असे मला वाटते.
दरम्यान, नागपूरमध्ये पावसामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि राज्य सरकारवर (State Government) आरोप केला जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार