Genelia Deshmukh | रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखने पोस्ट केले काही फोटो; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हीने अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. जिनिलियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. तिकडेही तिने आपले हक्काचे स्थान निर्माण केले. अभिनेता रितेश देशमुख (Actor Riteish Deshmukh) सोबत लग्न केल्याने ती मराठी मनोरंजन विश्वात चर्चिली जाऊ लागली. आता तिने मराठी सिनेविश्वात वेड या चित्रपटातून (Ved Movie) दमदार पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर लाखोंचा गल्ला कमावला. (Genelia Deshmukh Marathi Debut) अभिनेत्री जिनिलियाने (Genelia Deshmukh) आता तिच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आपले फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत.

अभिनेत्री जिनिलिया आणि तिचा पती रितेश देशमुख (Genelia And Riteish Deshmukh) यांची रियल लाईफ जोडी प्रेक्षकांना फार आवडते. ते अनेक फनी रिल्स शेअर करत असतात. आता जिनिलियाने तिच्या नवीन फोटोशुटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Genelia Deshmukh Photoshoot) या फोटोमध्ये ड्रेसवर सुंदर जरीचे नक्षीकाम केले आहे. फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडले असून केसांमध्ये फुले माळली आहेत. तिने बिंदीने आऊटफिटला लूक दिला असून यामध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केली आहे तर हातात मोत्याच्या बांगड्या घातल्या आहेत.

अभिनेत्री जिनिलिया देखमुखने (Genelia Deshmukh) या फोटोला ‘तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूकीला कधीही कमी लेखू नका’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोशुटमधील निखळ सौंदर्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहेत. जिनिलियाच्या या फोटोवर एका युजरने कमेंट केली आहे की, ‘20 वर्षाच्या तरुणीसारखे तुझे सौंदर्य आहे’. तर दुसऱ्याने ‘यहा मैं पिघल गया’ अशा शब्दात तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

 

 

Web Title : Genelia Deshmukh | genelia deshmukh dazzles in golden beige ethnic attire share photo on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा