SIP मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळतोय विनामूल्य मुदत विमा; जाणून घ्या कसा मिळेल फायदा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीने लोकांना एक गोष्ट जाणवून दिल आहे. या काळात नेहमी गुंतवणुकीचे आणि विम्याबाबत एक खात्री आणि महत्व पटवून दिल आहे. हे लोकांना अधिक फायद्याचे बनत आहे. लोकांमध्ये बचत करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिवर्तनाची वेळ बघता म्युच्युअल फंड आनंदाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं धोरणतही परिवर्तन केलं आहे. तर म्युच्युअल फंड हाऊस आता नव्या पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) प्रारंभ करण्याने मोफत विमा संरक्षणाचा लाभ देत आहेत.

भारता मधील काही निवडक म्युच्युअल फंड हाऊसेसनं SIP माध्यमातून मोफत विमा संरक्षणाचा लाभ देण्यास प्रारंभ केलाय. ज्या SIP मध्ये विमा संरक्षण देखील देण्यात येत आहे. यामध्ये ICICI Prudential, Mutual Fund SIP Plus, Nippon India Mutual Fund, SIP Insurance आणि आदित्य बिर्ला सनलाईफ सेन्च्युरी SIP यांचा समावेश असणार आहे. अर्थात, जर का गुंतवणूकदारांनी या SIP योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरू केले तर वैद्यकीय तपासणीशिवाय त्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. SIP माध्यमातून विम्याचा फायदा घेण्याच्या अनेक गुंतागुंत आहेत, ज्यास गुंतवणूकदारास प्रथम समजून घेतलं पाहिजे. असे विमा तज्ज्ञांचे मत आहे.

SIP ने दिलेला विमा संरक्षण हा ग्रुप मुदत विमा आहे. हे SIP बरोबर एकत्र केलं आहे. SIP मदतीने गुंतवणूकदार या टर्म कव्हरचा लाभ घेऊ शकणार आहे. फंड हाऊस १८ ते ५१ वर्षे वयोगटातील गुंतवणूकदारांना मुदतीचा विमा लाभ देता येणार आहे. या द्वारे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत कव्हर देण्यात येत आहे. आता निवडक म्युच्युअल फंड हाऊसेस प्रथम वर्षात SIP च्या रकमेपेक्षा १० पट जास्त विमा संरक्षण देतात. दुसऱ्या वर्षात गुंतवणूकीच्या रकमेच्या ५० पट आणि तिसऱ्या
जर व्यक्ती SIP प्लानमध्ये प्रति महिना १ हजार रुपये विमा १००० रुपये विमा संरक्षणसह गुंतवणूक करत असाल तर त्याला प्रथम वर्षी अनुक्रमे, १० हजार, ५० हजार, आणि १ लाख असा संरक्षण विमा मिळतो. अर्थात SIP प्रारंभ केलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या वर्षासाठी काही कारणाने निधन झाले तर त्याच्या वारसदाराला म्युच्युअल फंडाच्या युनिट्ससह १ लाख रुपये मिळणार.

दरम्यान, फंड हाऊस फक्त नवीन गुंतवणूकदारांना हा लाभ देत आहेत. हा लाभ घेण्यासाठी जुन्या गुंतवणूकदारांना नवीन SIP सुरू करावी लागेल. एखाद्या गुंतवणूकदाराने SIP च्या माध्यमातून विमा संरक्षण मिळविले असेल तर त्याला कमीतकमी ३ वर्षे नियमित गुंतवणूक करावी लागणार आहे. ३ वर्षापूर्वी SIP संपुष्टात आणल्यास मुदतीच्या विम्याचा फायदा संपुष्टात येईल. यांच्यासह ३ वर्ष SIP चालवल्यानंतरही त्याला मुदतीच्या विम्याचा लाभ मिळणार आहे.तसेच, जेव्हा गुंतवणूक थांबली जाईल तेव्हा संरक्षणाची रक्कम कमी होणार आहे.

या दरम्यान, SIP सोबत विनामूल्य मुदत विमा संरक्षणचा पर्याय वाईट नाही. उदाहरणासाठी जर व्यक्ती ५० लाख रूपयांचा मुदत विमा घेतला आणि त्या व्यक्तीच वय ३० वर्ष आहे, तर त्याला ४ हजार रूपयांपासून १० हजार ५०० रूपयांपर्यंतचं प्रिमिअम भरावं लागणार आहे. असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, फंड हाऊस व्यक्तीची रक्कम कुठे गुंतवतंय हे त्याला पाहावं लागणार आहे. तसेच, त्याची कामगिरी कशी आहे हे सुद्धा चेक करावे लागणार आहे. या सर्व गोष्टीची पडताळणी करूनच व्यक्तीला गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.