Ghoda Marathi Movie | वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला ‘घोडा’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
236
Ghoda Marathi Movie | ghoda marathi movie kailas waghmare marathi movie ghoda is going to hit the screens soon
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : ‘घोडा’ हा सिनेमा (Ghoda Marathi Movie) येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमातील मुख्य कलाकार कैलास वाघमारेने सिनेमाचं पोस्टर शेअर करत, “एक घोडदौड… जगण्याची… संघर्षाची… स्वप्नांची…! 17 फेब्रुवारी 2023 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात” असं कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे. या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आगामी सिनेमासाठी कैलासला शुभेच्छा देत आहेत.वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला ‘घोडा’ हा मराठी सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

स्वप्न पाहणं, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणं, त्या दरम्यान माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती अनुभवास येणं असा प्रवास घोडा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. एका बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलाला आणलेला घोडा पाहून अगदी तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते कशी धडपड करतात याची गोष्ट ‘घोडा’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

घोडा या चित्रपटाचे (Ghoda Marathi Movie) निर्माते टी. महेश आणि अनिल बबनराव हे आहेत.
तसेच उमेशचंद्र शिंदे आणि नयन चित्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
चित्रपटाचं दिग्दर्शन टी. महेश यांनी केलं आहे. जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन केलं आहे.
योगेश एम. कोळी यांनी छायांकन केलं असून रोहन पाटील यांनी संकलन केल आहे.
अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे,
वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. यादी कैलास वाघमारेने ‘शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला’
या नाटकात काम केलं आहे. तसेच ‘मनातल्या उन्हात’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टी त्याने पाऊल ठेवलं.
तसेच ‘हाफ तिकीट’, ‘ड्राय डे’, ‘भिकारी’ आणि अजय देवगणनचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या
चित्रपटातही त्याने मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत .

Web Title :- Ghoda Marathi Movie | ghoda marathi movie kailas waghmare marathi movie ghoda is going to hit the screens soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, भोसरी मधील प्रकार

Neha Malik | नेहा मलिकचा बोल्ड अंदाज; कर्वी फिगर करत वेधले सर्वांचे लक्ष