Ghoomer Trailer Out | अभिषेक बच्चन व सैयामी खेर यांच्या जबरदस्त घूमर चित्रपटाचा ट्रेलर आऊट; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पोलीसनामा ऑनलाइन – Ghoomer Trailer Out | बॉलीवूड चित्रपट प्रेमींसाठी ऑगस्ट महिना एक पर्वणीच ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक जबरदस्त स्टोरी असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस य़ेणार आहेत. यामध्ये आता अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या ‘घूमर’ या चित्रपटाची (Ghoomer Movie) देखील भर पडली आहे. अनेक वर्षानंतर अभिषेक हा मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्याच्या सोबत अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) ही देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. आगामी ‘घूमर’ चित्रपटाचा ट्रेलर (Ghoomer Trailer Out) आज (दि.04) सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षक देखील अवाक झाले आहेत. अवघ्या काही तासात घूमरच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

घूमर हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपट ट्रेलरच्या (Ghoomer Movie Storyline) सुरुवातीला प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटरची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. यावेळी एक प्रश्न विचारण्यात आला आहे की एका हाताने कोणी इंडिय़न टीमसाठी खेळू शकतो का ? या प्रश्नवर आधारित सर्व चित्रपटाची कहाणी आहे. क्रिकेटरची भूमिका अभिनेत्री सैयामी खेर हिने साकारली आहे तर अभिषेकने तिचा कोच हे पात्र साकारले आहे. अभिषेक बच्चनचा चित्रपटातील हटके लूक लक्षवेधी ठरत आहे. सैयामीने देखील चित्रपटातील पात्र उत्तमरित्या साकारलेले दिसत असून घूमर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे असे दिसून येत आहे.

घूमर या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन आर. बाल्की (R. Balki) यांनी केले असून
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Ghoomer Trailer Out) करण्यात आला आहे.
घूमर चित्रपटामध्ये हाय टेक ड्रामा बघायला मिळणार आहे.
येत्या 18 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित (Ghoomer Release Date) होणार आहे.
अभिषेक बच्चन व अभिनेत्री सैयामी खेर सह चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan),
इवांका दास (Ivanka Das), शबाना आझमी (Shabana Azmi),
अंगद बेदी (Angad Bedi) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल