Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही नेहमी चर्चेत असते. सईने अनेक हिट चित्रपट दिले असून तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. त्यांना सईच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे अफेअर (Sai Tamhankar Affair), रिलेशनशिप आणि लग्न याबद्दर तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. नुकतीच सईने (Sai Tamhankar) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या लोकप्रिय शो मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या जोडीदारबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच तिला कसा जोडीदार हवा याबद्दल सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CvUCMLLPRkb/?

igshid=MzRlODBiNWFlZA==https://www.instagram.com/p/Cu11Yvgo6Vt/?

igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CuL5-CPv3br/?igshid=MzRlODBiNWFlZA==

झी मराठी वरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो सध्या सर्वत्र गाजत आहे. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai In Khupte Tithe Gupte) हिने सहभाग घेतला आहे. तिचा प्रोमो झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हिला अवधुत गुप्ते (Avadhoot Gupte) याने अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. तसेच तिला तिच्या जोडीदाराबद्दल देखील विचारण्यात आले. “अनुरुप जोडी असण्यासाठी काही गुण जुळवावे लागतात. तुझ्या मते असा कोणता गुण आहे, जो तडजोड करणं अजिबात शक्य नाही”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने सई ताम्हणकरला विचारला. यावर तिने स्पष्ट उत्तर देत सई म्हणाली की, “स्वत: मध्ये स्व: ठेवून रिलेशनशिपमध्ये जगणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपून रिलेशनशिप करायला हवं. जो व्यक्ती स्वतःसोबत आपल्या जोडीदाराचेही स्वत्व ही जपतो, असा जोडीदार असणं गरजेचे आहे.” असे मत सईने मांडले आहे. अनेकांना तिचे हे विचार आवडले असून तिला सहमती दर्शवली आहे.

https://www.instagram.com/p/Ct8fTKav97J/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CsdiQgXIPDT/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/Cr99sDuIGEU/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CrjOEVGPL9q/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक
आयुष्यामुळे चर्चेत असते. सईचे आधी अमेय गोसावी (Amey Gosavi) याच्यासोबत लग्न

(Sai Tamhankar Marriage) झाले होते. मात्र तिचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही
आणि ते विभक्त झाले. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर ही चित्रपट निर्माता अनिश जोग (Anish Jog) याला डेट करत असल्याचे समोर येत आहे. (Sai Tamhankar Relationship) त्य़ांचे मध्यंतरी व्हेकेशनवर गेलेले फोटो व्हायरल झाले होते. अनेकदा ते देखील फोटो शेअर करत असतात. मात्र अद्याप अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिचे नाते जाहीर केलेले नाही.

https://www.instagram.com/p/Cqa9fz5o8q9/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/reel/CpG5ODrjIhu/?igshid=MzRlODBiNWFlZA==

https://www.instagram.com/p/CpEpUJxPnN3/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)