Girish Mahajan | उद्धव ठाकरे यांना गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले – भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भुजबळ यांचे तोंडभरून कौतुक केले. छगन भुजबळ सोबत राहिले असते, तर त्यांनाच मुख्यमंत्री केले असते असे ठाकरे म्हणाले होते. यावरून भाजपा आमदार (BJP MLA)  गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टोला लगावला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) आज धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते.

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंनाच व्हायचे होते. मग कुणीही त्यांच्यासोबत असते तरी. मग ते एकनाथ शिंदे असते किंवा भुजबळ असते तरी त्यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केले नसते.

महाजन पुढे म्हणाले, छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे. मी तर भुजबळ फुटल्यापासून 30 वर्षं सोबतच आहे. यांची किती टोकाची भाषा होती? पण आज हे एकमेकांना गुदगुल्या करत आहेत की ‘तुला मुख्यमंत्री केलं असतं, याला केलं असतं, मी झालो असतो, तो झाला असता’. आता यांच्या गंमतीजमती बघायला मिळत आहेत.

महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावरही टीका केली.
भाजपा आता वाणी-ब्राह्मणांचा पक्ष न राहाता बहुजनांचा पक्ष झालाय, असे वक्तव्य खडसे यांनी केले आहे.
यावर महाजन म्हणाले, बोलताना आपण लक्षात घ्यायला हवं की माणूस फक्त जातीवर समाजात मोठा होत नाही.
तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळेही मोठा होतो.

महाजन पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांबाबत (Devendra Fadnavis) आख्खा देश सांगेल की हा माणूस किती कॅलिबरचा आहे.
तुम्हाला खूप वाटतं की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. पण तुम्ही आत्मपरीक्षणही करायला हवे.
तुम्हाला जे वाटतं, ते लोकांनाही वाटलं पाहिजे. तुम्ही काय काय पराक्रम केले आहेत, ते सगळे समोर येत आहेत.
अशी टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. हा पक्ष जगातला सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे.
आता तुम्ही भाजपातून गेला आहात. आता तुम्हाला एवढं वाटतंय तर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवा.

Web Title :- Girish Mahajan | bjp girish mahajan mocks shivsena uddhav thackeray chhagan bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’