Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन- कोकणातील शिवसेना (Shivsena) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले होते की, भाजपची (BJP) आजपर्यंतची निती आणि वर्तवणूक पाहता शिंदे गटाला (Shinde Group) आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपशीच संघर्ष करावा लागणार आहे. जाधव यांनी केलेल्या या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिले आहे. सामंत यांनी म्हटले की, ज्यावेळी भाजप आमचा वापर करत आहे किंवा आमच्याकडून काही करून घेते आहे, असे आम्हाला वाटेल त्यावेळी त्यांना उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. ते चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलत होते. उदय सामंत (Uday Samant) यांनी थेट भाजपालाच इशारा दिल्याने राजकीय वर्तृळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

यावेळी भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, प्रत्येकवेळी कोणी काही बोलले तर त्याला उत्तर देणे गरजेचे नसते. तसेच उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप करताना सामंत म्हणाले, देशात सर्वात मोठा घोटाळा तेलगी स्टॅम्पचा (Telgi Stamp Scam) झाला होता. त्यानंतरचा मोठा घोटाळा आता झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प खरेदी केले असल्याचा संशय आहे. यामुळेच त्याचा तपास होणे गरजेचे आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीबाबत (Andheri East by-election) सामंत म्हणाले,
आमचाच उमेदवार निवडून येईल. आम्ही कशा पद्धतीने तयारी केली, उमेदवार निवडून आणण्यासठी कशा
पद्धतीने जोर लावला जाईल हे समोरच्याला कळेलच. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप
आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत.

Web Title :- Uday Samant | uday samant give answer to bhaskar jadhav over his statement about bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…,  नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप