Girish Mahajan On Manoj Jarange Patil | मंत्री गिरीश महाजन यांचा सक्त इशारा, ”आता मनोज जरांगेंना माफी नाही”

मुंबई : Girish Mahajan On Manoj Jarange Patil | छगन भुजबळ यांना ते बोलले, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले, काल-परवा तर मनोज जरांगे यांनी कळस गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिवीगाळ केली. आई-बहिणीवरून बोलले. त्यामुळे त्यांना आता माफी नाही, असा सक्त इशारा भाजपा नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते देखील आक्रमक झाले आहेत. आज यावरूनच मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंना इशारा दिला.(Girish Mahajan On Manoj Jarange Patil)

गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे यांना आम्ही खूप सहकार्य केले. मी स्वत: त्यांच्या उपोषणस्थळी सहा वेळा गेलो. इतर मंत्रीही होते. मुख्यमंत्री शिंदेही प्रोटोकॉल बाजूला ठेवून दोन वेळा तिथे गेले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल. त्यांनी सांगितल्यानुसार निर्णय घेतले. तरीही मी बोलेन तसेच करा, अशी भूमिका त्यांनी घेतली.

गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय संवेदनशील भूमिका घेत महायुती सरकारने
मनोज जरांगे यांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन सहकार्य केले. समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान केला.
मात्र समाजाची ढाल करून त्यांनी स्वतःचा स्वार्थी राजकीय अजेंडा रेटला.

गिरीश महाजन दावा केला की, महाराष्ट्रातील कोणालाच मनोज जरांगे जे बोलले ते आवडलेले नाही.
मराठा बांधवांनाही ते आवडलेले नाही.

जरांगे यांना आता आपल्या आवाक्यातच बोलावे. तुम्हाला संपवू, तुमच्या पक्षाचा सत्यानाश करू, असे ते म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांनी एकेरी उल्लेख केला होता. लोक बघून जरांगेंच्या डोक्यात हवा गेली होती.
मात्र आता लोकांनीही त्यांना खाली उतरवले आहे. ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्क्रिप्ट वाजवतात, असा आरोप
महाजन यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक