स्पर्म डोनेशनद्वारे जन्मलेल्या मुलीने शोधले आपले 63 भाऊ-बहिण, आता अशी होते सर्वांची भेट

फ्लोरिडा : वृत्तसंस्था –  अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी 23 वर्षांची कियानी एरोयो सध्या एका खास मिशनवर आहे. समलैंगिक जोडप्याची मुलगी कियानी एका स्पर्म डोनरच्या (sperm donor) मदतीने जन्माला आली आहे. आता कियानीने ठरवले आहे की, ती जगभरातील आपल्या भाऊ-बहिणींचा शोध घेणार आणि त्यांच्या संपर्कात राहील. आतापर्यंतच्या शोधाद्वारे तिने आपले 60 पेक्षा जास्त भाऊ-बहिण शोधून काढले आहेत. कियानी आपल्या स्पर्म डोनर (sperm donor) वडीलांसाठी फादर्स डे निमित्त कार्ड बनवत आली आहे. येथूनच तिच्यात आपल्या इतर भाऊ-बहिणींचा शोध घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

कियानीचा जन्म स्पर्म डोनरच्या मदतीने

कियानी स्वता एका स्पर्म डोनरच्या (sperm donor) मदतीने जन्माला आली आहे.
ती एका लेस्बियन कुटुंबात जन्माला आली, तिला दोना माता आहेत परंतु वडीलांची कमतरता तिला नेहमीच जाणवत राहिली.
द मिरर वेबसाइटसोबत बोलताना कियानीने म्हटले, मी जेव्हा 4 वर्षांची होते तेव्हा सोबतच्या मुलांना पहायची, त्यांच्या कुटुंबात आई-वडील पालक म्हणून होते.
परंतु माझ्या कुटुंबात पालक म्हणून दोन्ही माताच होत्या.

 

असा सुरू केला वडीलांचा शोध

कियानीने सांगितले की, तिला आपल्या वडीलांच्या बाबत केवळ एवढेच माहित होते की, त्यांची आवड आर्ट आणि खेळात होती.
कियानीला सुद्धा पेंटिंग आणि सर्फिंग पसंत होती, परंतु माझ्या आईचे कुटुंब असे नव्हते.

 

स्पर्म बँकेतून शोधला वडीलांचा पत्ता

कियानीने सांगितले की, अनेक वर्षापर्यंत तिच्या वडीलांचे प्रोफाईल प्रायव्हेट होते.
यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे अवघड होते कियानीने जेव्हा डोनर कंपनीसाठी प्रमोशनल व्हिडिओ टाकला.
तेव्हा तिच्या वडीलांचे मन बदलले आणि त्यांनी प्रोफाईल पब्लिक केले आणि कियानी आपल्या वडीलांशी संपर्क करू लागली.
यानंतर कियानीने 18 वर्षाचे वय पार करण्यापूर्वी आपल्या त्या भावा-बहिणींना शोधणे सुरूकेले जे तिच्या स्पर्म डोनर वडिलांद्वारे जन्माला आले होते.
स्पर्म बँकेशी संपर्क केल्यानंतर तिला आपल्या भाऊ-बहिणींबाबत माहिती मिळाली आणि ती त्यांना शोधू लागली.

 

 

फ्लोरिडात 12 भाऊ-बहिणी

कियानीने सांगितले आतापर्यंत तिने तिचे 63 भाऊ-बहिण शोधले आहेत.
कियानीच्या स्पर्म डोनर वडीलांपासून जन्मलेले तिचे भाऊ-बहिणी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये सुद्धा सापडले.
फ्लोरिडात तिचे 12 भाऊ-बहिण आहेत. ती आतापर्यंत 20-23 जणांना भेटली आहे.
ती म्हणाली, पुढील महिन्यात आम्ही पहिल्यांदा फॅमिली गेट टूगेदर करत आहोत.
25 जण येणार आहेत. इतरांचा शोध घेण्यासाठी आम्ही एक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवले आहे.
भेटलेले सर्वजण यावर अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Fact Check : सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट ? जाणून घ्या ‘सत्य’