गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे.गीता सध्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २०१८ च्या अखेरीस मोरी ऑब्स्टफेल्ड
हे निवृत्त होणार असून त्यांच्यानंतर गीता गोपीनाथ या मुख्य अर्थशास्त्रज्ञपदाचा पदभार स्वीकारतील. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लगार्ड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09cae845-c60c-11e8-8782-c96bb618671c’]
गोपीनाथ या जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा  अनुभव आहे. गीता यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून एमएची पदवी मिळवली आहे. एमएच्या पदवीनंतर त्यांनी प्रिंसटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे. गीता यांनी काही काळ केरळ मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.
[amazon_link asins=’B01A6NGYIM,B076VNYSJJ,B01HOD367O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]
आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन१ सप्टेंबर २००३ ते १ जानेवारी २००७  या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते. मोरी ऑब्स्टफेल्ड सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधाचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. ते डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर गीता गोपीनाथ यांच्याकडे या पदाची जबाबदारी असेल. त्या सध्या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
जाहिरात