ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने हा निर्णण घेतला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत होती. अखेर सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. इयत्ता 10 वी ची परीक्षा सर्वसासाधरपणे जून महिन्यात होणार आहे तर इयत्ता 12 वी ची परीक्षा मे महिन्याच्या अखेर होणार आहे असं सांगण्यात आलं आहे.

10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्याचे आरोग्य ही सरकारची प्राथमिकता आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या परवानगीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून काही दिवसांमध्ये अधिकृतरित्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तुर्तास नियोजित 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.