Glenmark pharma | ग्लेनमार्क फार्माने टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी भारतात झिटा डीएम टॅब्लेट केले लाँच

मुंबई : Glenmark pharma | संशोधनावर भर देणारी जागतिक फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या टेनेलिग्लिप्टीनचे डापाग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन यांच्यासह ट्रिपल ड्रग फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर केले आहे. हे एफडीसी झिटा डीएम या ब्रँड नावाने लॉन्च करण्यात आले असून त्यात डीपीपी ४ इनहिबिटर, टेनेलिग्लिप्टीन (२०एमजी), एसजीएलटी२ इनहिबिटर, डॅपग्लिफ्लोझिन, (१०एमजी), आणि मेटफॉर्मिन एसआर (५०० एमजी / १००० एमजी) यांचा निश्चित डोसमध्ये समावेश आहे. टाइप २ मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी, प्रिस्क्रिप्शननुसार हे दररोज एकदा घेतले पाहिजे. प्रति टॅब्लेट (प्रतिदिन) १४ रुपयांची किंमत असल्यामुळे या थेरपीचा दैनिक खर्च ३० टक्य्यांनी कमी होईल. (Glenmark pharma)

या लॉन्चच्या प्रसंगी ग्लेनमार्क फार्माचे इंडिया फॉर्म्युलेशन प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड आलोक मलिक म्हणाले, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची मधुमेही लोकसंख्या आहे आणि टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा अनियंत्रित हिमोग्लोबिन ए१सी (एचबीए१सी), बीटा सेल डिसफंक्शन, अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजन वाढण्यासारख्या इतर सह-विकारांसह इंसुलिन स्रावही कमी होतो. त्यामुळे या रुग्णांसाठी मधुमेहाचे व्यवस्थापन अवघड होते आणि आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांसाठी ते आव्हान बनते. मधुमेहावर उपचार करण्यात अग्रेसर असल्याने, आम्हाला झिटा डीएम हे नवीन आणि परवडणारे अँटी-डायबेटिक औषध सादर करताना अभिमान वाटतो. ते अधिक एचबीए१सी आणि इतर सह-विकार असलेल्या प्रौढ रुग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास मदत करते; तसेच मूत्रपिंड आणि हृदयाच्या मोठ्या प्रतिकूल घटना कमी करते. या सशक्त पार्श्वभूमीमुळे झिटा डीएम हे रुग्णांना दीर्घकालीन मधुमेह उपचारांचे पालन करण्यास मदत होईल, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. (Glenmark pharma)

ग्लेनमार्कच्या झिटा औषधांच्या पोर्टफोलिओचा भारतात दरवर्षी सुमारे १७ कोटी ५० लाख टाईप २ मधुमेही रुग्णांना फायदा होत आहे. झिटा डीएम लाँच केल्यामुळे, ग्लिपटिनची सर्वात व्यापक श्रेणी असलेल्या झिटाची आता टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर मदत होण्याची खात्री आहे.

ऑगस्ट २०२३ (एमएटी ऑगस्ट २०२३) मध्ये संपलेल्या १२ महिंन्याच्या आयक्यूव्हीआयए विक्रीच्या आकडेवारीनुसार, भारतातील तोंडी अँटी-डायबेटिक औषधांची बाजारपेठ १२,५२२ कोटी रुपयांची आहे, असा अंदाज आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या संबंधित कालावधीच्या (एमएटी ऑगस्ट २०२२) तुलनेत वार्षिक ६.५ टक्के वाढ झाली आहे. आयसीएमआर-इंडियाआयबी ने १७ ऑक्टोबर २००८ आणि १७ डिसेंबर २०२० दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार, मधुमेहाचा एकूण प्रसार ११.४ टक्के होता.

मधुमेह क्षेत्रातील ग्लेनमार्कची आघाडी :
मधुमेही रुग्णांसाठी, विशेषत: अनियंत्रित टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी, नवीन, प्रभावी आणि परवडणारे
उपचार पर्याय आणण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे. डीपीपी४ इनहिबिटर, टेनेलिग्लिप्टीन लाँच करणारे २०१५
मध्ये ग्लेनमार्क ही पहिली कंपनी होती. त्यानंतर टेनेलिग्लिप्टीन +मेटफॉर्मिनचे एफडीसी लाँच केले.
ग्लेनमार्कने नंतर २०१९ मध्ये एक नाविन्यपूर्ण एसजीएलटी-२ इनहिबिटर रेमोग्लिफ्लोझिन त्यानंतर त्याचे संमिश्रण
सादर केले. ग्लेनमार्कने २०२२ मध्ये सिटाग्लिप्टिन आणि त्याचे एफडीसी लाँच केले. त्यानंतर लोबेग्लिटाझोन
आणि टेनेलिग्लिप्टीनचे अतिरिक्त एफडीसी आले, त्यात पायोग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन +मेटफॉर्मिन,
आणि डॅपग्लिफ्लोझिन यांचा समावेश होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ललित पाटीलच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, म्हणाले-‘आता अनेकांची तोंडं…’ (व्हिडिओ)

Drug Mafia Lalit Patil | पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी