Drug Mafia Lalit Patil | पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा (Drug Racket) सूत्रधार ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) साकीनाका पोलिसांच्या पथकाने बंगळुरूमधून अटक केली. त्याला बुधवारी अंधेरीतल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तो साकीनाका पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. (Drug Mafia Lalit Patil)

दरम्यान, पुणे पोलिसांकडून (Pune Police) आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आल्याचं कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलाने एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने ललित पाटील याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललित पाटीलला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली. परंतु, सरकारी वकिलांनी सांगितले की, हे ड्रग्स रॅकेट खूप मोठे आहे. यामध्ये 12 आरोपी आहेत. पोलिसांनी ज्या 12 व्या आरोपीला अटक केली त्यावेळी त्याने सांगितलं की, तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला (Bhushan Patil) पुरवायचा आणि त्यानंतर ललित तो घेत होता. हे संपूर्ण ड्रग्स रॅकेट ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital Drug Racket) ऑपरेट केलं जात होतं. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Drug Mafia Lalit Patil)

अंधेरी कोर्टात नेमकं काय झालं?

सरकारी वकिलांनी या सगळ्या ड्रग्स प्रकरणात साकिनाका पोलिसांना पुढील चौकशीसाठी ललित पाटील याची रिमांड मिळावी, अशी मागणी कोर्टासमोर केली. नाशिक कारखान्यावर झालेल्या ड्रग्स कारवाई मध्ये ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यासाठी जो आरोपी मदत करत होता त्याने ललित पाटीलचे नाव चौकशी दरम्यान घेतले आहे.

त्यामुळे ड्रग्स प्रकरणात ललित पाटीलचा मोठा रोल आहे. तो ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच्यावर मुंबई, पुणे, नाशिक पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांना करायची असल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात सांगितले.

ललित पाटील याची बाजू मांडणारे वकील नसल्याने न्यायालयाकडून लीगल ऐड म्हणून वकील देण्यात आला. मात्र त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि कोर्टाने मुंबई पोलिसांना ललित पाटीलचा ताबा देण्यास परवानगी दिली.

कोर्ट रुम बाहेर आल्यानंतर ललित पाटील याने त्याच्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना सांगितले की, पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका आहे. मात्र कोर्ट रुम मध्ये त्याला बोलू दिले नाही. पाटील याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सोमवारी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील याची सुद्धा रिमांड मुंबई पोलिसांकडून मागितली जाऊ शकते.

ललित पाटीलने आरोप फेटाळले

आरोपी ललित पाटील याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप न्यायालयात फेटाळून लावले आहेत.
तसेच, माझ्याविरोधात पुरावे नसल्याचंही ललित पाटील याने सांगितले. यावर मुंबई पोलिसांनी सांगितलं,
या प्रकरणात अटक केलेल्या 12 व्या आरोपीने चौकशीत ललित पाटील याचे नाव घेतले आहे.
मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ललित पाटील याला अटक केली आहे.
आज वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टात हजर केले आहे.

ससून मधून पाळालो नाही तर पळवलं

दरम्यान, मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन,
असा इशारा ललित पाटीलने दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटीलला लगेच रुग्णालयात नेले.
मात्र, ललित पाटीलच्या या दाव्यात खरचं तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
तो हॉस्पिटलमधून ज्या प्रकारे पळून गेला तेव्हाच खरंतर संशयाची सुई निर्माण झाली होती.
ललित पाटीलचा शोध नाशिक पोलीस घेत होते. मात्र, तो नाशिकमध्येच होता अशी माहिती समोर आली आहे.
तसेच ललिच्या म्हणण्यानुसार तो पळाला नाही तर पळवलं गेलं असेल तर त्यात कोण कोण सहाभागी होतं,
याचा शोध घेतला गेला पाहिजे. याशिवाय त्याला पळवण्याचा उद्देश काय होता, यामध्ये कोणाची नाव लपवली जात
आहेत का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! पुणे पोलिसांनी अटक केलेला घुसखोर बांगलादेशी निघाला बॉम्ब स्फोटातील आरोपी, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती