सोन्याचे भाव तेजीत ! तोळ्याला 51 हजार 704 मोजावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याची परंपरा अनेकजण जपतात. देशभरात आजपासून नवरात्रौत्सवला प्रारंभ झाला आहे. या काळात सोने खरेदी करण्यास अनेक जण पसंती देतात. तुमचाही सोने खरेदीचे नियोजन असले तर सोन्याचे नवे दर जाणून घ्या. सोन्याचे दर चालू आठवड्यात घसरले असले होते. पण शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसली. त्याआधी सलग 3 दिवस सोन्याचे दर उतरले होते. कोरोनामुळे काही देशांनी लॉकडाऊन वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीचा सपोर्ट देशांतर्गत बाजारीतल किंमतीना मिळाल्याने सोन्याचे दर वाढले आहे.

काय आहेत सोन्याचे नवे दर
शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 324 रुपयांने वाढला. यानंतर सोन्याचे दर 51,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 1,910 डॉलर प्रति औंस एवढा आहे.

काय आहेत चांदीचे नवे दर
शुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील तेजी दिसली. दिल्लीतील सराफा बाजारत चांदीची किंमत 1595 रुपये प्रति किलोने वाढून 62,972 रुपये झाली आहे. गुरुवारी चांदीचे भाव 61,374 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.35 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत.

सोन्या-चांदीचे भाव का वाढले
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे सर्वच देशात अनिश्चितता आहे. अनेक युरोपिय देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचांदीच्या दरात तेजी आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूक वाढू शकते. याच कारणामुळे डॉलरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.