सोन्या-चांदीत मोठी घसरण ! आज किती रुपयांनी स्वस्त झाले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण होणार आहे. या दरम्यान, साठेबाज आणि ट्रे़डर्सने या दोन्ही धातूंची विक्री करून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे सोन्या, चांदीमध्ये मोठी घसरण दिसून येत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी विक्री सुरु झाली आहे. आज सोने आणि चांदीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. सोने ५५० रुपयांनी तर तर चांदीमध्ये ३००० रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८१८९ रुपये झाला आहे. त्यात ५५० रुपयांची घसरण झाली आहे. १ फेब्रुवारीला सोने २२०० रुपयांनी स्वस्त झाले होते. कमाॅडिटी बाजारात त्या दिवशी सोन्यामध्ये मोठी घसरण सुरु असताना चांदीमध्ये मात्र तेजी होती. आज मात्र चांदीवर देखील नफेखोरांची नजर पडली आहे. आज चांदीमध्ये सकाळपासून विक्री सुरु आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ७०३८० रुपये झाला आहे. त्यात ३२८० रुपयांची घसरण झाली आहे.

सोमवारच्या आकडेवारीच्या तुलनेत सध्याच्या आकडेवारीत ८६० रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबई सोन्याचा भाव –
२२ कॅरेट- ४७५९० रुपये
२४ कॅरेट- ४८५९० रुपये

पुण्यात सोन्याचा भाव –
२२ कॅरेट- ४८५९० रुपये
२४ कॅरेट- ४८५९० रुपये

दिल्लीत सोन्याचा भाव –
२२ कॅरेट- ४७३०० रुपये
२४ कॅरेट- ५१६०० रुपये

चेन्नई सोन्याचा भाव –
२२ कॅरेट- ४५९५० रुपये
२४ कॅरेट- ५०१३० रुपये

कोलकत्ता सोन्याचा भाव –
२२ कॅरेट- ४८०८० रुपये
२४ कॅरेट- ५०७८० रुपये